Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेबंधू एकत्र आलेयत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात ते लढतायत. राज आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनाभवनातून मुंबईसाठीचा संयुक्त वचननामा जाहीर केला. त्याला शब्द ठाकरेंचा असं नाव दिलं. मुंबईकरांसाठी भरघोस आश्वासनं ठाकरेंनी दिली आहेत. मात्र या जाहीरनाम्यात मराठी माणूस, हिंदू-हिंदुत्व गायब असल्याची टीका भाजप -शिवसेनेनं केलीय. पाहुयात हा रिपोर्ट
मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान असं म्हणत उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू शिवसेनाभवनात एकत्र आले. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा त्यांनी प्रकाशित केला वचननाम्याला म्हणजे जाहीरनाम्याला नाव दिलं... शब्द ठाकरेंचा!
हिंदुत्व आणि मराठी महापौर या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेनेच्या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं
पेशव्यांच्या काळात 3 संस्थान उभी राहिली गायकवाड, होळकर बडोद्यात मराठी साम्राज्य होत मग तीथे गुजराती महापौर का होत होता हो हा महाराष्ट्र मराठी लोकांचा आहे, इथे मराठी महापौर होणार आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, आमचा जो महापौर होणार तो मराठीच होणार भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा देण्यात आला
All Shows

































