एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
SRH vs RCB : बंगळुरुचा हैदराबादवर दांडगा विजय, 67 धावांनी दिली मात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/e68736130c15366999d691b8c4364416_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Royal challengers bangalore vs Sunrisers Hyderabad
1/10
![यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 54 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादचा (SRH vs RCB)67 धावांनी पराभव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880090ad2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 54 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादचा (SRH vs RCB)67 धावांनी पराभव केला आहे.
2/10
![नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने 193 धावांचे मोठे आव्हान चेन्नईला दिले, पण हैदराबादचे फलंदाज हे आव्हान पार करु शकले नाहीत. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर हैदराबाद पराभूत झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/156005c5baf40ff51a327f1c34f2975ba1dd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने 193 धावांचे मोठे आव्हान चेन्नईला दिले, पण हैदराबादचे फलंदाज हे आव्हान पार करु शकले नाहीत. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर हैदराबाद पराभूत झाली आहे.
3/10
![बंगळुरुच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादचा संघ 125 धावांवर सर्वबाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/8cda81fc7ad906927144235dda5fdf15baf96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरुच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादचा संघ 125 धावांवर सर्वबाद झाला.
4/10
![पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून फाफने आणि रजतने उत्तम सुरुवात केली. पण रजत 48 धावांवर बाद झाल्यावरही फाफने झुंज कायम ठेवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefc74ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून फाफने आणि रजतने उत्तम सुरुवात केली. पण रजत 48 धावांवर बाद झाल्यावरही फाफने झुंज कायम ठेवली.
5/10
![फाफला आधी मॅक्सवेलने 33 धावांची साथ दिली. तर फाफने 50 चेंडूत नाबाद 73 धावा झळकावल्या. अखेरची दोन षटकं खेळायला आलेल्या दिनेशने तुफान फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा कुटल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. त्यामुळे बंगळुरुने हैदराबादसमोर 193 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/30e62fddc14c05988b44e7c02788e187599ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फाफला आधी मॅक्सवेलने 33 धावांची साथ दिली. तर फाफने 50 चेंडूत नाबाद 73 धावा झळकावल्या. अखेरची दोन षटकं खेळायला आलेल्या दिनेशने तुफान फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा कुटल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. त्यामुळे बंगळुरुने हैदराबादसमोर 193 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
6/10
![193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. त्यांचा सलामीवीर अभिषेक आणि विल्यमसन शून्यावर बाद झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/032b2cc936860b03048302d991c3498f1ac58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. त्यांचा सलामीवीर अभिषेक आणि विल्यमसन शून्यावर बाद झाले.
7/10
![त्यानंतर मार्करम आणि राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्करम 21 धावा करुन बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/18e2999891374a475d0687ca9f989d83e0eae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर मार्करम आणि राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्करम 21 धावा करुन बाद झाला.
8/10
![राहुल क्रिजवर असताना दुसऱ्या बाजूने मात्र एक-एक गडी बाद होतचं होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660961a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल क्रिजवर असताना दुसऱ्या बाजूने मात्र एक-एक गडी बाद होतचं होते.
9/10
![बंगळुरुच्या फलंदाजानी 193 धावांचे दमदार लक्ष्य समोर ठेवले होते. हे पार करणं तसं शक्यही होतं. पण बंगळुरुच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत हे आव्हान पार करुन दिलं नाही. यावेळी वानिंदू हसरंगाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd908351.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरुच्या फलंदाजानी 193 धावांचे दमदार लक्ष्य समोर ठेवले होते. हे पार करणं तसं शक्यही होतं. पण बंगळुरुच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत हे आव्हान पार करुन दिलं नाही. यावेळी वानिंदू हसरंगाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
10/10
![राहुलने 37 चेंडूत 58 धावांची एकहाती झुंज दिली खरी पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने अखेर तोही बाद झाला. ज्यानंतर पुढील फलंदाज काही धावा करुन तंबूत परतले आणि हैदराबादता 67 धावांनी पराभव झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/ae566253288191ce5d879e51dae1d8c33316a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुलने 37 चेंडूत 58 धावांची एकहाती झुंज दिली खरी पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने अखेर तोही बाद झाला. ज्यानंतर पुढील फलंदाज काही धावा करुन तंबूत परतले आणि हैदराबादता 67 धावांनी पराभव झाला.
Published at : 09 May 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)