एक्स्प्लोर

शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यावर (Sharad Pawar) जेव्हा आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता असे सुळे म्हणाल्या. नैतिकत बघून निर्णय घ्यायला हवा असेही सुळे म्हणाल्या. मी राजीनामा का द्यायचा? या प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कोणता संबंध आहे, मग माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होते. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध

आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र येत आहेत. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, त्यांच्या परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात कधीही अंतर आलेले नाही. आम्ही त्यात कधीही राजकारण आणले नाही आणि अणणार पण नाही असेही सुळे म्हणाल्या. आजचा दिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मत बाजूला ठेवून सगळे नेते एकत्र आले होते. हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहचले पाहिजेत म्हणून त्या काळापासून उपक्रम सुरू आहेत. आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत त्या मागे ही मोठी ताकद आहे असेही सुळे म्हणाल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहणार 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात एक पत्र लिहणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दीड महिने झाले सरकारला पण मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोडमध्ये दिसतात बाकी कोणी दिसत नाही असेही सुळे म्हणाल्या. मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला 2025 मध्ये हळू हळू दिसेल. वित्तीय तूट व्यवस्थापन (Fiscal deficit management) हा कायदा जो अटलजी यांनी आणला होता त्याबद्दल विचार केला पाहिजे. अनेक एक्स्पर्ट जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत असेही सुळे म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मी आरोपी नाही. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही मग मी राजीनामा का द्यायचा? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. अनेकजण माझा राजीनामा मागत असल्याचे मुंडे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन थेट आरोप हे वाल्मिक कराड यांच्यावर होत आहेत. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन दूर करा अशी मागणी होत आहे. हा तपास सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय असा तिहेरी तपास असल्यानं माझा मंत्री म्हमून दबाव असू शकत नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

संतोष देशमुखांच्या खूना मागे कोण? हे शोधण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हवा : जितेंद्र आव्हाड

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ते गुन्हेगार आहेत, त्यांनी खून कोणी केला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. खून कोणी केला आणि त्याच्या मागे कोण आहे, हे शोधण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा पाहिजे असे आव्हाड म्हणाले. उद्या जिथे चौकशी आहे, तिथे धनंजय मुंडे जाऊ शकत नाहीत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.  दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याबाबत अद्याप अजित पवार का शांत आहेत. धनंजय मुंडे यांची विकेट घेऊन अजित पवार छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात एंन्ट्री देणार आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget