एक्स्प्लोर

Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!

Santosh Deshmukh Case : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून प्रणिती शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Praniti Shinde on Walmik Karad : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.   

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत, गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच महाराष्ट्राचा युपी बिहार करत आहेत. देशमुखांच्या मुलीने पोलीस संरक्षण मागितले. मात्र, तिला संरक्षण दिले नाही. म्हणजे बीडमध्ये प्रचंड दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखती देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातो मग सामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे

विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत विचारले असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी 100 टक्के राजीनामा दिला पाहिजे, कारण ते यात आहे असे दिसते. काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो. लोकांच्या दबावापोटी दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते. मात्र हे अहंकारी सरकार आहे ते राजीनामा देणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय. 

लाडक्या बहि‍णींना सावत्र करू नये

लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. याबाबत विचारले असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की,  लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठीचा चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहीणमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे, असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत.लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये, असे म्हणत त्यांनी सरकार निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Walmik Karad: वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप एपनिया' आजार नेमका काय आहे? पुरुषांना धोका अधिक? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget