एक्स्प्लोर
Dinesh Karthik : पहिल्या पत्नीकडून मित्राच्या साथीनं धोका, कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष, खरं प्रेम कसं मिळालं
Dinesh Karthik : आयपीएलमधील आरसीबीचा विकेटकीपर दिनेश कार्तिकचं पर्व अखेर संपलं आहे. दिनेश कार्तिकला आरसीबी आणि राजस्थाननं गार्ड ऑफ ऑनर दिला.
दिनेश कार्तिक
1/6

दिनेश कार्तिकनं आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सनं दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यामुळं दिनेश कार्तिकनं निवृत्ती घेतल्याच्या चर्चा होत आहेत.
2/6

दिनेश कार्तिकनं निवृत्तीवर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. आयपीएलचे प्रक्षेपक जिओ सिनेमानं दिनेश कार्तिक निवृत्त झाल्याचं जाहीर केलंय. कार्तिकच्या क्रिकेट कारकिर्दीत चढ उतार आले.
3/6

क्रिकेट प्रमाणं दिनेश कार्तिकला वैयक्तिक जीवनात संघर्ष करावा लागला. दिनेश कार्तिकला त्याच्या पहिल्या पत्नीनं मित्राच्या मदतीनं धोका दिला. भारताचा किक्रेटपटू मुरली विजय असं त्या मित्राचं नाव आहे.
4/6

दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीचं नाव निकिता वंजारा होतं. निकिता आणि कार्तिक लहानपणापासून मित्र होते. कार्तिकला घटस्फोट देत निकितानं मुरली विजयशी लग्न केलं.
5/6

पहिल्या पत्नीकडून धोका मिलाल्यानंतर दिनेश कार्तिकनं सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. हे सर्व 2012 दरम्यान घडलं होतं. 2015 नंतर कार्तिकला खरं प्रेम दीपिका पल्लीकल हिच्या रुपात मिळालं. दीपिका पल्लीकल स्क्वॅश खेळाडू आहे. माध्यमातील वृत्तांनुसार दिनेश कार्तिक आणि दीपिकाची मुलाखत जिममध्ये प्रशिक्षणादरम्यान झाली होती. दोघेही एकाच कोचजवळ फिटनेस प्रशिक्षण घेत होते.
6/6

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली. 2013 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. यानंतर 18 ऑगस्ट 2015 ला दोघांनी लग्न केलं होतं. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल या दोघांना जुळी मुलं आहेत.
Published at : 23 May 2024 01:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























