एक्स्प्लोर
RCB Victory Celebrations Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; 10 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती!
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीच्या विजयाला गालबोट, आयपीएल विजयोत्सवासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांची चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
RCB Victory Celebrations Stampede
1/8

आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली.
2/8

यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त चाहते जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
3/8

रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या RCB ने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करुन आयपीएल 2025 च्या चषकावर नाव कोरलं. तब्बल 18 वर्षांनी RCB ने मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड आहे.
4/8

. त्यामुळेच आज बंगळुरुत अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले आहेत.
5/8

आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
6/8

चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 10 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
7/8

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
8/8

पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती.
Published at : 04 Jun 2025 06:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
पुणे
























