एक्स्प्लोर
Sangli Maratha Kranti Morcha : सांगलीत मराठा क्रांतीचा विराट मोर्चा; तरुणी, महिलांचा लक्षणीय सहभाग

sangli maratha kranti morcha
1/10

मराठा आरक्षण मागणीसाठी आणि अंतरवली सराटीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला.
2/10

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.
3/10

क्रांतीसिंह नाना पाटील यांना पुष्पहार अर्पण करून आणि 100 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मोर्चाला सुरुवात झाली.
4/10

मशाल हाती घेतलेल्या महिलांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली.
5/10

मोर्चा सुरू असताना संततधारदार पावसाने हजेरी लावली.
6/10

विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला.
7/10

लाखोंचा समुदाय मोर्चात सहभागी झाला होता.
8/10

राममंदिर चौकामध्ये मोर्चाच्यावतीने एका तरुणीसह पाच युवकांनी आरक्षण मागणीबाबत भाषण केले.
9/10

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले.
10/10

आतापर्यंत मूक असणारा मोर्चा आता घोषणापर्यंत गेला आहे. जर सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो विचार केला नाही तर आणखी आक्रमक पध्दतीने मराठा मोर्चा रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा संयोजकानी दिला.
Published at : 17 Sep 2023 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion