एक्स्प्लोर
Ratnagiri Accident : भोस्ते घाटात कंटेनरची टेम्पोला धडक, दोन जणांचा जागीच मृत्यू
भोस्ते घाटातील तीव्र उतारावर हा अपघात झाल्याने आयशर टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे पंचवीस फूट खोल खड्ड्यात पलटी झाला.
Ratnagiri Bhoste Ghat Accident
1/6

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनरने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. या अपघातात आयशर टेम्पोमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2/6

हा अपघात संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार,राजापूरहून अलिबागच्या दिशेने मासेमारी करण्याचे जाळे घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
3/6

भोस्ते घाटातील तीव्र उतारावर हा अपघात झाल्याने आयशर टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे पंचवीस फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात आयशर टेम्पोच्या चालकासह एक जण गंभीर जखमी झाला. तर टेम्पोच्या पाठीमागील बाजूस बसलेले दोन कामगार टेम्पो पलटी झाल्यामुळे खाली अडकून पडले होते.
4/6

कंटेनरची धडक इतकी जोराची होती की क्षणात टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल खड्ड्यात पलटी झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे बचाव कार्यात देखील अनेक अडथळे होते त्यात पाऊस पडत असल्यामुळे टेम्पोच्या खाली अडकलेल्या त्या दोन कामगारांना बाहेर काढताना खूप अडचणी आल्या.
5/6

कशेडी वाहतूक पोलीस, खेड पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालक यांनी त्या दोन कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु अपघात होऊन बराचसा कालावधी लोटल्यामुळे त्या गंभीरित्या जखमी झालेल्या कामगारांची प्राणज्योत मालवली.
6/6

या अपघातामुळे मुंबई - गोवा मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती.
Published at : 04 Aug 2023 07:19 AM (IST)
आणखी पाहा






















