एक्स्प्लोर

SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर

SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्याची तारीख जाहीर कारण्यात आली आहे.

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवीच्या परीक्षेची प्रवेशपत्र (Maharashtra SSC Hall Ticket 2025) ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्याची तारीख जाहीर कारण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. 20 जानेवारी 2025 पासून अॅडमिट कार्ड (Admit Card) या लिंकव्दारे डाऊनलोड (Download) करण्याकरिता उपलब्ध होतील.या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधनेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन कसं मिळणार?

1.फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

2. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online)  प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.

3. ज्या आवेदनपत्रांना "Paid" असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे "Paid Status Admit Card" या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.

4. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे "Extra Seat No Admit Card या पर्यायान्दारे उपलब्ध होतील.

5. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याध्यर्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून

बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा  फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र  उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेची प्रवेशपत्र 10 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बारावीची प्रवेशपत्रं  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड या लिंकवरुन डाऊनलोड करता येतील. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, अशा सूचना दिल्या आहेत. 

समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्व प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत  असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget