एक्स्प्लोर
छत्रपती संभाजीराजेंना जिथं कैद करुन ठेवलं, त्या देसाईवाड्याची दूरवस्था
रत्नागिरीच्या बावडा येथील खासगी जागेत उभ्या असलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तुची ही अवस्था पाहुन मन व्यथित झाले.
Chhatrapati sambhajiraje historical wada
1/7

निवडणूक काळात गुजरात आणि महाराष्ट्र असा चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीकडून होतो. त्यातच, संजय राऊत यांनी थेट औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाल्याचं म्हटलं. पण, औरंगजेबाची कबर खुलताबाद येथ आहे.
2/7

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे आहे. राज्य सरकारने औरंगबादचे नामांतर करुन छत्रपती संभाजीनगर केले आहे. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अनोतान हाल करुन त्यांना ठार मारले. त्या औरंगजेबाचीही कबर महाराष्ट्रातच आहे.
3/7

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या ठिकाणी कैद केले त्या सरदेसाई वाड्यास (बावडा ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भेट दिली. यावेळी, ऐतिहासिक वास्तूची झालेली दूरवस्था पाहून त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
4/7

रत्नागिरीच्या बावडा येथील खासगी जागेत उभ्या असलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तुची ही अवस्था पाहुन मन व्यथित झाले. सरकारकडे लवकरच याबाबत पाठपुरावा करेल,असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
5/7

संगमेश्वर जवळ कसबा येथे मुकर्रबखानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार १ फेब्रुवारी १६८९ रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले ते
6/7

संभाजीराजेंना संगमेश्वर जवळील देसाई वाड्यात कैद करुन ठेवण्यात आले होते. तेथून प्रचितगड च्या घनदाट आणि निर्भीड घाटातून शिराळातर्फे कराडला नेण्यात आले. कराड हा मुघली भक्कम चौक मानला जात.
7/7

येथून संभाजीराजेंना मोठ्या फौजेसाहित बहादूर गड (पेडगाव) ला नेण्यात आले. त्यानंतर, बहादूर गडआणि वढु बुद्रुक येथे छळ करण्यात आला, असा इतिहास आहे.
Published at : 01 May 2024 05:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























