एक्स्प्लोर
PHOTO : दापोलीत समुद्राला उधाण; नारळ, सुपारीची झाडे जमीनदोस्त
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील नारळी, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून उधाणाचे पाणी भात शेतीत शिरल्याने शेतीचेही मोठ नुकसान झाले आहे.

Murud Beach Coconut Areca Nut Tree
1/9

दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला उधाण आल्याने नारळ, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.
2/9

समुद्रकिनाऱ्यांना धूपप्रतिबंधक बंधारे नसल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या उधाणात समुद्रालगत असणाऱ्या बागायती शेतीचे नुकसान झाले आहे.
3/9

किनाऱ्यावरील नारळी, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून उधाणाचे पाणी भात शेतीत शिरल्याने शेतीचेही मोठ नुकसान झाले आहे.
4/9

गेले काही दिवस किनारी भागात सातत्याने लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे.
5/9

वेगाने आलेल्या लाटांनी नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे.
6/9

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी बागायतदारांची अनेक वर्षांची मागणी आहे.
7/9

परंतु प्रशासनाकडून याकडे डोळेझाक होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
8/9

मुरुड गाव पर्यटनांसाठी प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्यावरील नारळ, पोफळीच्या बागा, उंच वाढणारे सुरु पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
9/9

परंतु या बागा आता समुद्राच्या उधाणामुळे उन्मळून जमीनदोस्त होत आहे
Published at : 27 Jul 2022 11:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion