पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
एपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे. या फाईलमध्ये अनेक अल्पवयीन मुलींची नावं आहेत, त्यामुळे तिथे पूर्ण पेपर काळे केले असल्याने काही नावं स्पष्ट दिसत नाहीत.

मुंबई : देशात 19 डिसेंबर रोजी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा एपस्टिन फाईलसंदर्भात भाष्य केलं आहे. तसेच, आपण 19 तारखेसंदर्भात जे बोललो ती शक्यता वर्तवली होती, कुठलाही दावा केलेला नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. एपस्टिन फाईलसंदर्भात अजूनही अनेक कागदपत्रं समोर येत आहेत, त्यामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.दरम्यान, येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान (Prime minister) बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले आहे. पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते, असंही चव्हाण यांनी सांगितले.
एपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे. या फाईलमध्ये अनेक अल्पवयीन मुलींची नावं आहेत, त्यामुळे तिथे पूर्ण पेपर काळे केले असल्याने काही नावं स्पष्ट दिसत नाहीत. भारतातली अनेक नावं या फाईलमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 19 तारखेला राजकीय मोठी उलथा पालथ होईल हा माझा दावा नव्हता तर मी शक्यता म्हटलं होतं. अजूनही अनेक कागदपत्र समोर येत आहेत, त्यामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
मराठी पंतप्रधान होणार असं मी म्हटलं होतं, ती कोणती नावं आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत. त्यामुळे कोण होणार? हे सर्वांना माहीत आहे. भारताचे पंतप्रधान ऑन बोर्ड आहेत, हे समोर आलंय, असेही चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळावरही त्यांनी परखडपणे भूमिका मांडली.
अदानीशी काही संबंध आहे का? चौकशी करा
इंडीगोचा जो काही घोळ होता, त्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे. संपूर्ण हवाई वाहतुकीमध्ये इंडिगोचा सर्वाधिक शेअर आहे, त्याचा हा परिणाम आहे. कंपनीच्या एकूण मालमत्तेपैकी दहा टक्के दंड करता येऊ शकतो असा कायदा वाजपेयी यांच्या काळात आणला होता, त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अदानी यांनी पायलट ट्रेनिंग सुरू केल्यानंतर पाच दिवसात हे सर्व झालं आहे. त्यामुळे, याचा काही संबंध आहे का? याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.
हेही वाचा
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला






















