एक्स्प्लोर

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.

मुंबई : राज्यातील महापालिका (Mahapalika election) निवडणुकांसाठी आज २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार, मुंबई (Mumbai) महापालिकेसाठी कार्यालयीन कामकाजाच्‍या वेळेत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. मात्र, पहिल्‍या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. राज्‍य निवडणूक, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्‍यानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज पहिल्‍याच दिवशी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये दिनांक २३ डिसेंबर ते दिनांक २९ डिसेंबर २०२५ या दरम्‍यान कार्यालयीन वेळेत तर, मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे उपलब्‍ध होतील. गुरूवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ आणि रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्रे दिली जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्रे स्‍वीकारण्‍याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर ते दिनांक ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत आहे. गुरूवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ आणि रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्रे स्‍वीकारण्‍यात येणार नाहीत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार छाननी

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून केली जाणार आहे. तर, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशन झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेचच प्रसिद्ध करण्‍यात येईल. उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक दिनांक २ जानेवारी २०२६ सकाळी ११ ते दुपारी ३ असा आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया व निकाल जाहीर करण्‍यात येईल. नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैधता तपासणी, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याचे सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

याशिवाय, नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून, कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित नामनिर्देशन बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.

कोणत्या कार्यालयातून किती अर्ज वितरीत

ए विभाग - १८ 
बी विभाग -२५
सी विभाग -४६
डी विभाग -५२ 
ई विभाग - २२५
एफ उत्‍तर विभाग - २००
एफ दक्षिण विभाग - १०७
जी उत्‍तर विभाग - १८५ 
जी दक्षिण विभाग - ११८ 
एल विभाग - ३४७
एम पूर्व  विभाग - २२८ 
एम पश्चिम - ४१९ 
एन विभाग - १५६ 
एस विभााग-२४०
टी विभाग -११६ 
एच पूर्व अधिक के पूर्व विभाग - १०२ 
एच पूर्व अधिक एच पश्चिम विभाग -२६३
के पूर्व अधिक के उत्‍तर विभााग-२४०     
के पूर्व -३०० 
पी दक्षिण विभाग -१८३ 
पी उत्‍तर विभाग - ९२ 
पी पूर्व विभाग - १८३ 
आर दक्षिण विभाग -१६४ 
आर मध्‍य विभाग - ८० 
आर उत्‍तर विभाग - ७६ 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget