एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2025: पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
Ganesh Chaturthi 2025: आज राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपती घरी आणले जात आहेत. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह
Konkan Ganpati agaman
1/19

कोकणात गौरी गणपतीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
2/19

काळानुरूप सणांमध्ये बदल झाले तरी कोकणी माणसाने मात्र रूढी - प्रथा - परंपरा आजही जपल्या आहेत.
3/19

कोकणातील प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो.
4/19

त्यामुळे पारंपारिक ढोल ताशांचा गजर करत कोकणात गावागावांमध्ये गणपतीचे आगमन होते. महिला, लहान मुलं देखील यामध्ये उत्साहाने सहभागी होतात.
5/19

कोकणातील संगमेश्वर इथे होडीतून लाडक्या गणरायाला घरी आणण्यात आले.
6/19

होडीतून गणपती आणतानाचे मनमोहक दृश्य
7/19

कोकणात गणपती बाप्पाचे आगमन
8/19

कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव आकर्षणाचा विषय आहे.
9/19

कोकणातील दुर्गम गावांमध्ये आजही बाप्पाला होडीतून किंवा डोक्यावरुन घरी आणले जाते.
10/19

तळकोकणात लाडक्या बाप्पाच घरोघरी आज आगमन होत आहे.
11/19

कुणी डोक्यावर बाप्पाला घेऊन घरी नेत आहेत, तर कुणी पालखीतून लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जातानाचा दृश्य पाहायला मिळत आहेत.
12/19

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो मुंबईस्थित गणेशभक्त आपापल्या घरी दाखल झाले असून जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण आहे.
13/19

जिल्ह्यात ७२ हजार ७५५ घरगुती गणपती आज विराजमान होणार आहेत.
14/19

तर जिल्ह्यात ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो.
15/19

सकाळपासून लाडक्या बाप्पाला घरी आणून कोकणातील गणेश भक्त बाप्पाची मनोभावे सेवा करत आहेत.
16/19

संगमेश्वर येथे गणपती बाप्पाला होडीतून घरी आणण्यात आले.
17/19

लाडक्या गणरायाचे कोकणात आगमन
18/19

गणपती बाप्पाला होडीतून घरी नेतानाचे दृश्य
19/19

कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन
Published at : 27 Aug 2025 07:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























