Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
मुंबईतलं वाढतं हवा प्रदुषण हा चिंतेचा विषय झालाय. या हवा प्रदुषणामुळे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. याचीच दखल घेत कोर्टाने महापालिका प्रशासन, आयुक्त आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावले.
आणि लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. हवा प्रदुषणावर कोर्टातलं वातावरण कसं तापलं पाहूया...
ही दृश्य राजधानी दिल्लीतली नाहीत.. तर आपल्या राज्याची राजधानी मुंबईची आहेत. मुंबईचा आजचा एक्यूआय... अर्थात् एअर क्वालिटी इंडेक्स १०४ आहे, जो धोक्याच्या पातळीवर आहे. लोकांच्या आरोग्यावर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतोय. आणि त्यामुळेच आज हायकोर्टात वातावरण चांगलंच तापलं... मुंंबईतल्या हवा प्रदुषणाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेत, मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावलेत... महापालिका आयुक्तांवर तर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केलीये.
कोर्टाने असे ताशेरे ओढल्यानंतर महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी काय प्रतिक्रिया दिलीये
याचिकाकर्त्यांनी नियमावलीच काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी काही सूचना केल्या आहेत त्यांचा आम्ही विचार करतोय
आमच्या अखत्यारीत जे काही येत त्यासंदर्भात आम्हाला उद्या अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल आहे
पण मुंबईतली हवा दिवसेंदिवस का ढासळतेय? आजच्या सुनावणीदरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे मुलभूत कर्तव्य असल्याची आठवणही कोर्टाने करुन दिलीये... कोर्टाने दखल घेतल्यानंतर आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त या वाढत्या हवा प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे, पण तोवर आपणच स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.
All Shows

































