एक्स्प्लोर
Ratnagiri Accident: मुंबई-गोवा हायवेवर एलपीजी टँकर उलटला, गॅस गळतीमुळे घबराट, वाहतूक ठप्प!
हातखंबा येथे एलपीजी टँकर पुलावरून कोसळला; हा अपघात 29 जुलै रोजी रात्री घडला. गॅस गळतीमुळे घबराट, रेस्क्यू टीम सक्रिय, नागरिक हलवले, महामार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंद.
मुंबई-गोवा महामार्ग अपघात
1/10

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ एक गंभीर अपघात घडला असून, एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असून, टँकर उलटल्यानंतर त्यामधून गॅसची गळती सुरू झाली , ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
2/10

ही घटना काल, 29 जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि गॅसची गळती तात्पुरती रोखली. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने जवळपासच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
Published at : 29 Jul 2025 11:16 AM (IST)
आणखी पाहा























