एक्स्प्लोर
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान
पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
Pune rain Farmer onion fire lightening
1/8

पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
2/8

जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे विजेच्या कडकडाटात शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराखीला आग लागून मोठे नुकसान झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली
3/8

चासकरमळा, महाळूंगे पडवळ येथील शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर मंगळवार सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वीज पडून ती पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत कांद्याचा संपूर्ण साठा आणि लाकडी बराखी भस्मसात झाली आहे.
4/8

वीज कोसळून लागलेल्या आगीनंतर शेतकऱ्याने आग विझविण्यासाठी मोठी धावाधाव केली, पण आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत संपूर्ण बराख जळून खाक झाली आहे.
5/8

घटनास्थळी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट सुरू होता. विजेचा मोठा आवाज झाल्यानंतर अचानक बराखीला आग लागल्याचे निदर्शनास आले. बराखी पूर्ण लाकडाची असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.
6/8

सरपंच सुजाता चासकर यांच्या घराच्या बाजूलाच ही बराखी असल्याने आग वेळीच लक्षात आली. सरपंच सुजाताताई चासकर, सचिन भाऊ चासकर व अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा जोर एवढा होता की संपूर्ण बराखी आणि कांदा साठा जळून खाक झाला.
7/8

सुदैवाने आजूबाजूला घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या आगीत शेतकरी सुनील चासकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
8/8

शेतकऱ्याच्या शेताली या आग दुर्घटनेचे फोटो समाजमाध्यमातून समोर आले असून आग विझवतानाची धडपड पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. तसेच, प्रशासनाने शेतकऱ्याला मदत करावी, अशी मागणीही जोर धरत आहे
Published at : 20 May 2025 09:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























