नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
गेल्या चार दिवसांपासून राज्यात थंडीची लाट होती. ही लाट काहीशी ओसरली असली तरी राज्यात गारठा कायम आहे

Maharashtra weather update: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगला घसरलाय. बहुतांश ठिकाणी प्रचंड गारठा वाढला असून थंडीपासून वाचण्यासाठी लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवू लागले आहेत. मराठवाड्यात, विदर्भात तापमान 10 अंशाच्या खाली आल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मध्य महाराष्ट्रातही हवेतील गारठा कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात थंडीची लाट होती. ही लाट काहीशी ओसरली असली तरी राज्यात गारठा कायम आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या आजच्या तापमानानुसार, नाशिक 8.8 अंश सेल्सिअस तर पुण्याचे तापमान 9.4 अंशांवर होते. अहिल्यानगरमध्येही 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढील चार दिवस तापमान कसे?
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताच्या वायव्य दिशेला तापमानाचा पारा हळूहळू घसरत आहे. येत्या 24 तासात तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील सात दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. तापमानात चढउतार नसले तरी हवेतील गारवा कायम राहणार आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान हळूहळू वाढणार आहे. किमान तापमानात पुढील दोन दिवस कुठलाही बदल होणार नसून त्यानंतर एक ते दोन अंशांनी तापमान घसरेल.
आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
कोकण
डहाणू – 15.4°C
पणजी (गोवा) – 19.8°C
हरनाई – 21.0°C
मुंबई (सीएलबी) – 21.7°C
मुंबई (एससीझेड) – 17.0°C
रत्नागिरी – 18.5°C
मध्य महाराष्ट्र
अहिल्यानगर – 8.5°C
जळगाव – 10.3°C
जेऊर – 7.5°C
कोल्हापूर – 15.1°C
महाबळेश्वर – 12.1°C
नाशिक – 8.8°C
पुणे – 9.4°C
सांगली – 14.8°C
सातारा – 13.5°C
सोलापूर – 14.9°C
मराठवाडा
छ. संभाजीनगर- 10.9°C
नांदेड – 10.4°C
धाराशिव – 10.4°C
परभणी – 11.3°C
विदर्भ
अकोला – 11.0°C
अमरावती – 11.3°C
ब्रह्मपुरी – 12.4°C
बुलढाणा – 12.3°C
चंद्रपूर – 13.0°C
नागपूर – 9.6°C
वर्धा – 10.8°C
यवतमाळ – 10.0°C
पुण्यात थंडीचा जोर वाढला
महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाबळेश्वरमधील गारठ्याचा परिणाम पुण्यातही जाणवत असून आज पुण्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुण्यातील तापमान सातत्याने घसरत असून, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुण्यात दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.























