Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Madhuri Elephant Return to Nandani Math : माधुरी हत्तीणीच्या (Madhuri Elephant) संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Madhuri Elephant Return to Nandani Math : माधुरी हत्तीणीच्या (Madhuri Elephant) संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला (Mahadevi Hattini) नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत सुनावणी झाली. मागील निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. तसेच नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीणीचं असलेलं नातं विशेष करून अधोरेखित करण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी यावेळी दिली.
Madhuri Elephant Return: माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत समाधानकारक अहवाल सादर
दरम्यान, पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून 12 कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दलही सुनावणीत महत्वपूर्ण चर्चा झाली. माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली. माधुरी हत्तीणीच्या संदर्भात अतिशय सकारत्मक सुनावणी पार पडली आहे. मागील सुनावणीप्रमाणे नियुक्त केलेल्या समतीने समाधानकारक अहवाल सादर केला.
Vantara Conservation Center : वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
माधुरी हत्तीणीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचे ठरलं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच एचपीसी, न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला. त्या पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्वपरवानगी दिल्या गेल्याय. एकूणच आता इथून पुढं सदर ठिकाणी कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमानता निर्माण झाली. अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिलीय.
माधुरीबाबत पूर्ण वस्तुस्थिती मांडली, झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकांराकडून समाधान व्यक्त
आता माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणीनंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाल्याने त्याबाबतीमध्ये आवश्यकता परवानगी देण्याची कार्यवाही भूमिका एचपीसीकडून घेतली गेली. झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकांरानी समाधान व्यक्त केले आणि एचपीसीसमोर एकूणच माधुरीबाबत पूर्ण वस्तुस्थिती मांडून पुढच्या प्रक्रियेला एक गतिमांत प्राप्त झाल्याचेही वकील मनोज पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























