Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Dhurandhar Box Office Collection Day 11: 'धुरंधर'नं दुसऱ्या आठवड्यातही मोठी कमाई केली आहे. सिनेमानं पहिल्या आठवड्याच्या एकूण नफ्याला मागे टाकत, दुसऱ्या आठवड्यात इतिहास रचला आहे.

Dhurandhar Box Office Collection Day 11: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित फिल्म 'धुरंधर' (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालतेय. सध्या या सिनेमाची क्रेझ संपूर्ण देशभरात पाहायला मिळतेय. सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सिनेमाचं जणू वादळ आलंय. याचा अंदाज तुम्ही सिनेमाच्या धुवांधार कमाईवरुन नक्कीच बांधू शकता. या सिनेमानं पहिल्या आठवड्यात प्रचंड कमाई केलीच. पण, या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यातही मोठी कमाई केली आहे. सिनेमानं पहिल्या आठवड्याच्या एकूण नफ्याला मागे टाकत, दुसऱ्या आठवड्यात इतिहास रचला आहे.
'धुरंधर' सिनेमानं अकराव्या दिवशी किती कमावले? (Dhurandhar BO Collection On Eleventh Day?)
'धुरंधर' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या दमदार अभिनयासह, या चित्रपटानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे, केवळ आठवड्याच्या शेवटीच नव्हे तर आठवड्याच्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. बरं, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीच सुपरहिट झाला आहे, पण आता हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चित्रपट ज्या वेगानं कमाई करतोय ते पाहता, 'धुरंधर' यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा हिट सिनेमा बनण्याच्या मार्गावर आहे, हे स्पष्ट आहे. सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये काहीशी घट झाली असली तरी, अकराव्या दिवसाच्या मानानं 'धुरंधर'नं चांगली कमाई केली आहे.
View this post on Instagram
'धुरंधर'चं एकूण कलेक्शन किती? (Total Collection Of Dhurandhar)
'धुरंधर' सिनेमाच्या एकूण कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'धुरंधर'नं पहिल्या आठवड्यात 207.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर, आठव्या दिवशी 'धुरंधर'नं 32.5 कोटींची कमाई केली आहे. तसेच, नवव्या दिवशी 53 कोटी आणि दहाव्या दिवशी 58 कोटींची कमाई केलीय.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर'नं रिलीजच्या अकराव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी 29 कोटी कमावले आहेत. यासह, 'धुरंधर'ची एकूण 11 दिवसांची कमाई आता 379.75 कोटी झाली आहे.
'धुरंधर' दुसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'धुरंधर' रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच विक्रम मोडतोय. दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतरही, त्याची कमाई मंदावली नाही किंवा त्याची रेकॉर्डब्रेक मालिका थांबलेली नाही. दुसऱ्या सोमवारी, रिलीजच्या अकराव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला, त्यानं 'पुष्पा 2' (20.5 कोटी रुपये) आणि 'स्त्री 2' (18.5 कोटी रुपये) च्या कलेक्शनला मागे टाकलं आहे.
'धुरंधर' 400 कोटींपासून काही पावलं दूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर वादळं आणलंय. अकरा दिवसांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही धुवांधार कमाई करतोय आणि 400 कोटींचा टप्पा गाठण्यापासून फक्त 25 कोटी दूर आहे. हा सिनेमा रिलीजच्या 12 व्या किंवा 13 व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आहे, 'छावा'नंतर असं करणारा हा या वर्षातील दुसरा चित्रपट असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























