NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Election) स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं. शहरातील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Election) मध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला.(Pimpri Chinchwad Election)
नाना काटे आणि अजित गव्हाणे यांनी अजित दादा आणि सुप्रिया ताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतचं ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं. या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारीच्या चिन्हावर उमेदवार उभे करायचे? की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं? केवळ दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करायची की एकनाथ शिंदे शिवसेनेला सोबत घ्यायचं? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणतं समीकरण अंतिम करायचं? यावर दोन्ही राष्ट्रवादीने ही पहिल्यांदाच एकत्रितरित्या चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.























