एक्स्प्लोर
Maharashtra Bandh : पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन!
बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती मात्र कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेत ठीक ठिकाणी राज्यभरात आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन, काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध.
1/6

पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन होत आहे.
2/6

आंदोलनाच्या स्थळी शरद पावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
3/6

बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना (Badlapur Minor Abuse) समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
4/6

त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
5/6

गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली होती.
6/6

मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
Published at : 24 Aug 2024 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion