एक्स्प्लोर
Advertisement

Pune News : एनडीएच्या महिला कॅडेट्सची पहिली तुकडी पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी, राष्ट्रपती मुर्मूंची प्रमुख उपस्थिती
कदम कदम बढाए जाची धून आणि देशभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत वातावरणात पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमीच्या 145 व्या तुकडीचं दीक्षांत संचलन पार पडलं.

Pune news
1/8

'कदम कदम बढाए जा' ची धून आणि देशभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत वातावरणात पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमीच्या 145 व्या तुकडीचं दीक्षांत संचलन पार पडलं.
2/8

एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिला कॅडेट्सचा सहभाग हे यावेळच्या संचलनाचं खास वैशिष्ट्य होतं. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली.
3/8

स्वतःच्या आवडीचं करिअर निवडताना आजही महिलांना संघर्ष करावा लागतो.या पार्श्वभूमीवर आजची घटना ऐतिहासिक असल्याचं यावेळी राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या.
4/8

एनडीएची पासिंग आऊट परेड म्हणजेच दिक्षांत संचलन हा अतिशय दिमाखदार सोहळा असतो.
5/8

लष्करी शिस्त, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या संरक्षण सिद्धतेच दर्शन त्यातून घडत असतं.दीक्षांत संचलनादरम्यान सुखोई तसेच लष्करी हेलिकॉफ्टरने उपस्थितांना शानदार सलामी दिली.
6/8

एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी बजावलेल्या कॅडेट्सचा याप्रसंगी विविध पदकं देऊन गौरव करण्यात आला.
7/8

145 व्या तुकडीचा विद्यार्थी हरहवर्धन भोसले हा मराठी कॅडेट कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
8/8

एनडीए मधून एकूण 353 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
Published at : 30 Nov 2023 07:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
ठाणे
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
