Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Devendra Fadnavis: 15 लाख 72 हजार कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या विदर्भात करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis: 15 लाख 72 हजार कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या विदर्भात करण्यात आली आहे. सामंजस्य करार नुसतेच होत नाही तर अमलात देखील आणले जातात. देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. विदर्भाच्या विकासाचा आणि गुंतवणुकीचा विचार केला तर गडचिरोली गुंतवणुकीचं नवं मॅग्नेट तयार होतंय. गडचिरोलीत आता सर्वाधिक गुंतवणूक होते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनातील (Maharashtra Winter Session 2025) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यातील गुंतवणुकीबाबत माहिती देताना सांगितलं (Maharashtra Winter Session 2025) कि, मिहानमध्ये 31 कंपनी कार्यरत आहे. तर आणखी 22 कंपनी सुरु होत आहे. आणि मिहान हे देशातलं असं केंद्र झालं आहे कि आयटीच्या क्षेत्रातले जे बिग सिक्स आहेत ते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी त्यातून निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल. (Maharashtra Winter Session 2025)
Devendra Fadnavis : सोलर मॉडेलमध्ये विदर्भ देशात एक क्रमांकावर होणार
अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून 15 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. सोलर मॉडेलमध्ये विदर्भ देशात एक क्रमांकावर होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात 50 हजार कोटीची गुंतवणूक आली आहे. त्यातून आता 50-60 हजार रोजगार निर्माण होणार आहे. नागपूरच्या मिहानमध्ये रोजगार आला नाही असं बऱ्याचं जणांचा समज आहे. मात्र मला सांगितलं पाहिजे कि मिहानमध्ये 31 कंपनी कार्यरत आहे. तर आणखी 22 कंपनी सुरु होत आहे. आणि मिहान हे देशातलं असं केंद्र झालं आहे कि आयटीच्या क्षेत्रातले जे बिग सिक्स आहेत ते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी आहे. सोबतच मिहानमध्ये आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 1 लाख 27 हजार 225 लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच विमानतळ विस्ताराचे देखील काम सुरु झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (रविवारी) हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना हि माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यातील गुंतवणुकीबाबत माहिती देताना सांगितलंय.
Devendra Fadnavis: तीन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकरी दिली, दोन वर्षात तेवढ्याच नोकऱ्या देणार
महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यावर आपण महाभरती हि योजना आणली. त्यानुसार गेल्या तीन वर्षात आम्ही 1 लाख 20 हजार लोकांना आपण सरकारी नोकरी दिली. पुढच्या दोन वर्षात तेवढ्याच नोकऱ्या आमचं सरकार देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती करण्याचं काम आम्ही केलंय, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा























