Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
बनसकंठा जिल्हाधिकारी मिहिर पटेल म्हणाले की, सुमारे 500 लोकांचा जमाव तेथे आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. जमावाने दगडफेक केली आणि धनुष्यबाणांनी हल्ला केला.

Gujarat Crime: गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्रापासून 14 किमी अंतरावर असलेल्या दांता तालुक्यातील पडलिया गावात 500 जणांनी वन विभाग आणि पोलिस पथकावर हल्ला केला. दगडफेक, गोफणी आणि धनुष्य बाणाने हल्ला करत पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले. जमावाने पोलिस आणि वन विभागाच्या सरकारी वाहनांनाही आग लावली. या घटनेत पोलिस, वन आणि महसूल विभागातील 47 अधिकारी जखमी झाले. जखमींपैकी 36 जणांना अंबाजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर 11 जणांना पालनपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हल्ल्याचे कारण जमिनीचा वाद
दरम्यान, बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी सांगितले की, दुपारी 2:30 च्या सुमारास पोलिस, वन आणि महसूल अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक 9 परिसरात रोपवाटिका आणि वृक्षारोपण करत असताना ही घटना घडली. पडलिया गावात वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक 9 क्षेत्रावरून बराच काळ वाद सुरू असल्याचा दावा केला जात आहे. जेव्हा पथक झाडे लावण्यासाठी आले तेव्हा हल्ल्याची तयारी करणाऱ्या लोकांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हल्ल्यादरम्यान वन विभागाच्या गाड्यांना आग लावण्यात आली आणि सरकारी वाहनांचे टायर फोडण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी 50 हून अधिक गोळ्या झाडल्या. 20 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
#WATCH | गुजरात के बनासकांठा में उग्र भीड़ ने किया पथराव, पुलिस और वन विभाग की टाम पर हमला@aparna_journo | https://t.co/smwhXUROiK #Gujarat #Banaskantha #Police #ABPNews pic.twitter.com/R02UJiWfad
— ABP News (@ABPNews) December 14, 2025
लोकांनी दगड, धनुष्यबाणांनी हल्ला केला
बनसकंठा जिल्हाधिकारी मिहिर पटेल म्हणाले की, सुमारे 500 लोकांचा जमाव तेथे आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. जमावाने दगडफेक केली आणि धनुष्यबाणांनी हल्ला केला. जखमी अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हिंसाचाराचे ठिकाण दांता तालुक्यात आहे, जे तीर्थक्षेत्र अंबाजीपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























