Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Ahilyanagar Leopard Attack : नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र होतं.

अहिल्यानगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा (Ahilyanagar Leopard Attack) वावर आणि त्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी आपले जीव गमावल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. अशातच अहिल्यानगरमध्येही बिबट्याच्या (Ahilyanagar Leopard Attack) हल्ल्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात ही घटना घडली. काल (शनिवारी ता, १३) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने (Ahilyanagar Leopard Attack) दारात उभ्या असलेल्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याला जागेवरच ठार केलं. या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र होतं.(Ahilyanagar Leopard Attack)
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर शोध मोहीम सुरू
या चार वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने ठार केल्याच्या प्रकरणी नागरिक आणि नातेवाईक संतप्त झाले होते. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील ही घटना आहे. नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाइकांसह ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता. वनविभागाकडून बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर शोध मोहीम सुरू होती. परिसरात अनेक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. बिबट्याला ठार करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. एकुलता एक असलेल्या मुलाला डोळ्यासमोर बिबट्याने उचलून नेत ठार केले होते.
Ahilyanagar Leopard Attack : नेमकं काय घडलं?
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.
Ahilyanagar Leopard Attack : पारनेरमध्ये चार बिबटे जेरबंद
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. 2 डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पारनेर तालुक्यातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं.























