एक्स्प्लोर
गळ्यात कवड्याची माळ, डोक्यावर मावळ्याची पगडी, खांद्यावर पालखी; अमित शाहांचे रायगडावरील हटके फोटो
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आज रायगडावर जाऊन समाधीस्थळाचे दर्शन घेतले
Amit shah in raigad photos
1/8

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आज रायगडावर जाऊन समाधीस्थळाचे दर्शन घेतले
2/8

किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची निस्सीम श्रद्धा असलेल्या श्री जगदीश्वराचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेत येथील विविध उपक्रमात ते सहभागी झाले होते.
3/8

रायगडावर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळीही अमित शाह नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.
4/8

रायगडावर पालखी सोहळ्यात सहभागी होत अमित शाह यांनी शिवरायांच्या पालखीला खांद्यावर घेत पायी वारी केली.
5/8

गळ्यात कवड्याची माळ आणि डोक्यावर मावळ्याची पगडी परिधान करुन अमित शाह यांनी रायगडावरुन भाषण केले. त्यावेळी, रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून प्रेरणास्थान असल्याचंही त्यांनी म्हटलं.
6/8

राजमाता जिजाऊ यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचे पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणाही दिली.
7/8

अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शिवेंद्रराजे हेही पालखी वाहताना दिसून येत आहेत.
8/8

राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो, जिजाऊंनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. बाल शिवाला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनीच दिला, असेही शाह यांनी म्हटले
Published at : 12 Apr 2025 05:55 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















