एक्स्प्लोर
Temperature today: अवकाळीनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटांना सुरुवात! संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्मा वाढला, तुमच्या जिल्ह्याचं तापमान तपासा
अवकाळी फटक्यानंतर पुन्हा उष्णतेच्या लाटांना सुरुवात! संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्मा वाढला, तुमच्या जिल्ह्याचं तापमान तपासा
Temperature
1/6

राज्यात अवकाळी पावसाच्या फटकाऱ्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटांना सुरुवात होत असल्याचे इशारे हवामान विभागाने दिले आहेत.
2/6

गेल्या काही दिवसांत राज्यात पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता प्रचंड उन्हाचा चटका आणि उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्यात.
3/6

आज राज्यभरातले कमाल तापमान प्रचंड असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 40 अंशांच्या पुढे तापमान गेलंय.
4/6

आज पुण्यात 38 अंश तापमान आज नोंदवलं गेलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.4 अंश तापमानाची नोंद आहे. बीड, सोलापूर आज 39 अंशांवर आहेत.
5/6

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात प्रचंड तापमानाची नोंद होत असून उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
6/6

पुढील पाच दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे.
Published at : 06 Apr 2025 02:10 PM (IST)
आणखी पाहा






















