एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2023 : प्रभो शिवाजी राजा! दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करून आकर्षक कलाकृती, सुमन दाभोलकरचं रॉक आर्ट
Chhatrapati Shivaji Maharaj Rock Art : दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करून कलाकृती घडवणारा चित्रकार सुमन दाभोलकरचं रॉक आर्ट, पाहा फोटो.

Chhatrapati Shivaji Maharaj Rock Art | Shiv Jayanti 2023
1/8

हातोडा आणि छणीचा वापर करून दगडापासून मूर्ती घडवलेले अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील.
2/8

पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील सुमन दाभोलकर या अवलियाने दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करून आकर्षक कलाकृती साकारली आहे.
3/8

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून सुमन दाभोलकरने सुंदर रॉक आर्ट शेअर केलं आहे.
4/8

स्टोन आर्ट साकारणारा सुमन दाभोलकरने दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्टोन आर्ट साकारून त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केलं आहे.
5/8

सुमनने आतापर्यंत दगडावर 50 हून अधिक शिल्पकृती साकारल्या आहेत. त्याच्या या अनोख्या कलेचं फार कौतुक होत आहे. निसर्गात जे सहज उपलब्ध आहे त्याचा वापर करुन सुमन कलाकृती साकारतो
6/8

दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करत साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रासह सुमनने शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह कपिल देवही साकारले आहेत.
7/8

तसेच सुमनने प्रसिद्ध अभिनेते, क्रिकेटपटू, कवी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, विविध प्राणी पक्षी यांच्याही शिल्पकृती साकारल्या आहेत.
8/8

आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व ठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडताना दिसत आहे.
Published at : 19 Feb 2023 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
