एक्स्प्लोर
PHOTO : शिंदे गटात किती आमदार? गुवाहाटीमध्ये शिंदे समर्थकांचं फोटोसेशन
Shinde Group MLA
1/7

शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे.
2/7

याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे फोटोत दिसत आहे.
3/7

गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्येमध्ये शिंदे समर्थकांनी फोटोसेशन करत शक्तिप्रदर्शन केलं
4/7

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही.
5/7

आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत.
6/7

यावेळी एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व करताना पहिला फोटो समोर आला आहे.एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना संबोधित केलं. यावेळी बाळासाहेबांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या.
7/7

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आणि अपक्ष मिळून 42 आमदार आहेत. यात शिवसेनेच्या 35 आणि 7 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
Published at : 23 Jun 2022 02:26 PM (IST)
आणखी पाहा






















