एक्स्प्लोर
Uttarkashi Tunnel Rescue : 'भारत माता की जय', बोगद्यातून सुटका होताच कामगारांच्या घोषणा, 41 कामगारांची अखेर सुटका
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांची अखेर सुटका झाली आहे.
Uttarkashi Tunnel Rescue Operation (Photo Credit ANI)
1/9

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली.
2/9

बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
3/9

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरतं रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं आहे.
4/9

सुरुवातील दोन कामगारांना बाहेर काढण्यात आलं, नंतर सर्व कामगारांची सुटका करण्यात आली.
5/9

बोगद्याच्या बाहेर येताच कामगारांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
6/9

गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं.
7/9

उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.
8/9

तब्बल 17 दिवसांनी या 41 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आलं आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आलं.
9/9

बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली.
Published at : 28 Nov 2023 08:33 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















