एक्स्प्लोर

Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?

Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे.

Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील (Arvind Kejriwal) आणि भाजपच्या परवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्यात लढत झाली होती. यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. त्यामुळे जायंट किलर म्हणून परवेश वर्मा यांच्याकडे पाहिलं जात आहे. या विजयानंतर परवेश वर्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत.

परवेश वर्मा यांना 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते, पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन मिळाले होते.  त्याऐवजी जनकपुरीचे आमदार जगदीश मुखी यांनी पश्चिम दिल्लीत निवडणूक लढवली.  द्वारका येथे 22 मार्च 2009 रोजी आयोजित महापंचायतमध्ये परवेश यांना तिकीट नाकारण्याच्या भाजपच्या निर्णयाचा निषेध केला होता. परवेश वर्मा यांची पत्नी स्वाती सिंग या माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजप नेते विक्रम वर्मा यांची मुलगी आहे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा अशी 3 अपत्ये आहेत.

कोण आहे परवेश वर्मा? 

- दिल्ली विधानसभा निवडणुकीत परवेश वर्मा यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली
- परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा निवडूक लढवून बाजी मारली 
- परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत 
- 48 वर्षीय परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आहेत 
- परवेश वर्मा 2014 आणि 2019 असे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  
- 2019 मध्ये दिल्लीच्या इतिहासत सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून परवेश यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5 लाख 78 हजार 486 इतकं मोठं मताधिक्य मिळालं होतं.

परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत- 

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. याशिवाय, प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणे भारतीय जनता पक्षाला सोपे जाईल. परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते. जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे. 

संबंधित बातमी:

Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले....

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Embed widget