एक्स्प्लोर

NDA Government In 19 States : तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री

NDA Government In 19 States : मार्च 2018 मध्ये एनडीएने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सरकार स्थापन करून 21 राज्यांत पोहोचले. यासह एनडीएने इंदिरा यांच्या काळातील काँग्रेसच्या विक्रमाची बरोबरी केली.

NDA Government In 19 States : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून तब्बल 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत परतला आहे. भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. दिल्लीच्या मतदानादिवशी गंगास्नान, भर निवडणुकीत 12 लाखांची करमुक्ती भाजपच्या यशास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. दिल्लीत आपची वाताहत झाली असून केजरीवाल स्वत: पराभूत झाल्याने पक्षाचा बुरूज कोसळला आहे. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. 

मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये 5 राज्यांमध्ये भाजप युतीचे सरकार स्थापन 

दुसरीकडे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यावर्षी 8 राज्यांमध्ये निवडणूक लढवली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश आहे.  यामध्ये आंध्र, अरुणाचल, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या 5 राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि एसकेएम यांच्यातील युती तुटली, तथापि, दोघेही केंद्रात एकत्र आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंडमध्ये जेएमएम यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सरकार आहे. दिल्लीतील भाजपच्या विजयाने देशातील 19 राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे मध्य भारत भाजप आणि एनडीएमधील मित्रपक्षांचे सरकार आहे. 

भाजप युतीने 2018 मध्ये इंदिराजींच्या विक्रमाची बरोबरी केली

2018 मध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा विक्रम भाजप आघाडीच्या नावावर होता. मार्च 2018 मध्ये एनडीएने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सरकार स्थापन करून 21 राज्यांत पोहोचले. यासह एनडीएने इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेसच्या विक्रमाची बरोबरी केली. स्वतंत्र भारतात राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा केंद्रासह 21 राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती.

तर एनडीए जुन्या विक्रमावर पोहोचला असता

हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये भाजप युतीने निवडणूक जिंकली असती तर विक्रमी 21 राज्यांमध्ये त्यांचे सरकार आले असते. हा एक विक्रम ठरला असता. 2024 मध्ये, झारखंड विधानसभेत JMM आघाडीला 81 जागांपैकी 56 जागा मिळाल्या, तर भाजपला 21 जागांवर घसरण झाली. तर 2022 मध्ये हिमाचल प्रदेशात 68 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते.

आता पुढील परीक्षा बिहार विधानसभेला 

बिहार विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभेच्या 243 जागांमध्ये आरजेडीचे 79, भाजपचे 78, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, आमदार 12, एचएएम पक्षाचे 4, सीपीआयचे 2, सीपीएमचे 2, एआयएमआयएमचे एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत. 2024 मध्ये बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांपैकी एनडीएला 30 जागा मिळाल्या होत्या, तर इंडिया आघाडीला 9 जागा मिळाल्या. 14 वर्षांनंतर पप्पू यादव अपक्ष उमेदवार म्हणून पूर्णियातून विजयी झाले. बिहारमध्ये 35 वर्षांनंतर सीपीआय (एमएल) चे खाते उघडले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला 2 जागांचा फायदा झाला होता. तर आरजेडीने पुनरागमन करत 4 जागा जिंकल्या. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएने 9 जागा गमावल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget