Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
पुण्यात ज्या पद्धतीने बिबट्यांचा वावर आहे. ते बघता लवकरच तुमच्या गाडीमागे कुत्रा धावताना दिसेल की बिबट्या हे सांगणे कठीण होईल. बिबट्या दिसला असं कोणीही सांगू लागलं आहे आणि त्यावर अविश्वास दाखवावा अशी परिस्थिती उरलेली नाही. पाषाण भागातील सुतारवाडीमध्ये रहिवासी भागात बिबट्या दिसल्याचा दावा काहींनी केला आणि खळबळ माजली. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे. पाहुयात
बिबट्या आला रे आला...अशा हाकाटीनं भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली...
आणि सुरू झालं पीपली लाईव्ह सिनेमासारखं नाट्य...
पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ बिबट्याला पहिल्याचा दावा एका मुलीनं केला...
तर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्याची दोन पाळीव कुत्री गायब झाल्याचं सांगितलं...
बिबट्याच्या दहशतीनं पाषाणमधली सुतारवाडी खडबडून जागी झाली...
पुण्याच्या औंध आणि बावधन परिसरात याआधी बिबटया आढळून आला होता...
आता त्यानं पाषाणवाडीत धुमाकूळ घातलाय...
शुक्रवारी पहाटे हा बिबट्या एका सोसायटीच्या गेटवरून उडी मारताना एका सुरक्षारक्षकानं पाहिलं...
नंतर तो शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर चालताना दिसला...
ल्या १५ दिवसांपासून औंध, बाणेर, बावधनमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय...
पुणे एअरपोर्टच्या परिसरात देखील दोन बिबटे असल्याचं स्पष्ट झालंय...
बिबट्यांना वनविभागाकडून पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
पण बिबटे हुलकावणी देत असल्यानं लोक घाबरलेत...
बिबट्यांचा वावर आधी पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटामध्ये होता...
पण जंगलांवरचं अतिक्रमण आणि उसाची शेती वाढल्यानं बिबट्यांनी उसामध्ये आसरा घेतला...
आता शिकारीऐवजी बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागलेत...
काही ठिकाणी त्यांनी माणसांनाही लक्ष्य केलंय...
बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्यात...
पण आता जंगलातून महानगरात धाव घेतलेल्या बिबटे सध्यातरी सरकारच्या प्रयत्नांना पुरून उरतायत...
मंदार गोंजारी, एबीपी, माझा, पुणे...
All Shows

































