Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
गेल्या सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबांनी तपशील उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात, असे म्हटले होते.

Devendra Fadnavis Meets Prithviraj Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एपस्टिन फाईल प्रकरणांतर देशाच्या राजकारण पुढील महिनाभरात मोठा भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. तसेच मराठी माणूस पंतप्रधान होईल असंही म्हटलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चर्चांना पूर्णविराम देत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरत पलटवार केला होता. यानंतर आता दोन्ही नेते एकत्र येण्याचा प्रसंग सातारमध्ये घडला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या लेकीच्या लग्नामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमने सामने आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूलाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बसले होते. पृथ्वीराज चव्हाण सोफा सेटवर बसले असताना देवेंद्र फडणवीस समोरून आले. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांनी वाकून नमस्कार केला. यावेळी बाजूला असलेले चंद्रशेखर बावनकुळे बसले असताना उभे राहिले. यावेळी दोघांनी स्मितहास्य करत हस्तांदोलन केले.
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता
दुसरीकडे, आठवड्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला होता. देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. गेल्या सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात.
View this post on Instagram
मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता
चव्हाण म्हणाले, “जेफ्री एपस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीने अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि विविध देशांतील काही प्रभावशाली नेत्यांची नावे त्यात समोर आली. त्या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख असल्याचे दिसते. अमेरिकन संसदेने या प्रकरणाचा सातत्याने मागोवा घेत असून सुमारे दहा हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. ती माहिती सार्वजनिक झाली तर ट्रम्प यांना पदाचा राजीनामा देण्याच्या स्थितीत जावे लागू शकते. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनीही एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या महिन्यात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता मी व्यक्त केली आहे. फक्त एवढेच म्हटले की ‘मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो’; त्याचा अर्थ प्रत्येकाने स्वतःच्या आकलनाने लावावा, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.
फडणवीस यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत 2029 मध्ये मोदीच पीएम असतील, असे म्हटले होते. ते म्हणाले की, पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात, नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत. देशांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, ते पाहता कोणीही करू शकत नाही. मोदींचे आरोग्य उत्तम आहे, 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशाप्रकारचे आहे. त्यामुळे, 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या























