Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
नंदुरबारमध्ये होणाऱ्या अश्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हाईट कोब्रा अश्व सारंगखेडा इथं दाखल झालाय... देशभरातील विविध १५ स्पर्धा व्हाईट कोब्रा अश्वानं जिंकल्या आहेत..
पांढराशुभ्र घोडा पाण्यासाठी देशभरातील अश्वशोकीन सारंगखेडा दाखल झालेत.9 डिसेंबर पासून अश्वांची स्पर्धा सुरू होणार आहे..
सारंगखेडा अश्व यात्रेत यंदा दोन पाहुण्या ठरतायत खास आकर्षण, मध्य प्रदेशातील १ कोटी १७ लाखांची रुद्राणी आणि उत्तर प्रदेशातील ६० इंच उंचीची मोरणी या दोन घोड्या वाढवतायत यात्रेचं ग्लॅमर
सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलमध्ये यंदा अश्वप्रेमींसाठी दुहेरी आकर्षण. मध्य प्रदेशातून आलेली कोटींची रुद्राणी आणि उत्तर प्रदेशची रुबाबदार मोरणी… त्यांच्या आगमनाने यात्रेचा दरारा आणखीनच वाढला आहे. सुरुवात करुया रुद्राणीपासून… फक्त २२ महिन्यांची, पण उंचीत तब्बल ६५ प्लस. बांधणी, व्यक्तिमत्त्व आणि दमदार चाल पाहून जाणकारही थक्क. पुष्कर बाजारात रुद्राणीची किंमत १ कोटी १७ लाख ठरली होती. तिच्या डाएटचीही चर्चा रंगतेय… रुद्राणीला दररोज मिळतात ८ लिटर गाईचे दूध… विशेष निगा, प्रीमियम केअर आणि अश्वसौंदर्यामुळे ती यात्रेतील सेलिब्रिटी ठरली आहे.























