एक्स्प्लोर

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'

Smriti Mandhana: टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्मृतीने स्वत: माहिती देत याबाबत घोषणा केली आहे.

Smriti Mandhana: टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्मृतीने स्वत: माहिती देत याबाबत घोषणा केली आहे. स्मृतीने पोस्ट करत म्हटलं आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. पलाश मुच्छलनेही पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

आता पुढे जाण्याची वेळ आली आहे

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.

पलाश मुच्छलने सुद्धा लग्न मोडल्याची माहिती दिली 

दरम्यान, स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे. पलश मुच्छलने म्हटलं आहे की,  मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे

आपण समाज म्हणून, कोणाच्याही बदनामीच्या अफवा किंवा न पडताळलेल्या गोष्टी ऐकून त्याचा न्याय करण्याआधी थोडा थांबायला शिकलं पाहिजे, अशी खरी इच्छा आहे. आपले शब्द कोणाला किती खोल जखम करू शकतात, हे आपल्याला कधी कधी समजतही नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असतानाच, जगात अजून अनेक लोक मोठ्या अडचणींना सामोरं जात आहेत. खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्या सोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली, त्या सर्वांचे मनापासून आभार.

लग्नाच्या आदल्या रात्री काय घडलं?

लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत सर्वकाही सांगलीत धुमधडाक्यात लग्न सुरु होतं. यादरम्यान, स्मृतींच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे वडील रुग्णालयात दाखल होताच स्मृतीने कोणताही विचार न करता विवाहसोहळा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला. दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नव्हे, तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळले. त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी-संगीताचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget