Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे.. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं .मात्र
सरकारच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलीय.. विरोधक सत्ताधाऱ्यांना पत्र लिहून चहापानावर बहिष्कार टाकणार आहेत.. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचाराचा मुद्दा, राज्यावरील कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीचा मुद्दा, बेरोजगारी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत..
दुपारी बारा वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन यामध्ये विरोधकांची स्टॅटर्जी ठरवली जाणार.. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज दुपारी दोन वाजता विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
विरोधीपक्षनेत्याशिवाय अधिवेशन पार पडत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिलीये.
आम्ही बिजनेस अड्व्हायजरी कमिटीच्या बैठकीत विषय मांडला आणि विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधीपक्षनेता नेमा अशी मागणी केली मात्र यावर कुठलाच उत्तर दिलं नाही विधानसभा अध्यक्ष फक्त हो हो म्हणतात मात्र करत काहीच नाही त्यांना विरोधी पक्षाशिवाय अधिवेशन चालवायच आहे. आज आमची महाविकास आघाडीची बैठक पार पडत आहे थोड्या वेळात चहापानला जायचं की नाही याबाबत निर्णय घेऊ























