एक्स्प्लोर
Santosh Deshmukh : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात मस्साजोगनं मिळवला दुसरा क्रमांक, संरपंच संतोष देशमुख यांच्या कार्याचा गौरव, मात्र...
Santosh Deshmukh : बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात दुसरा क्रमांक मिळाला आहे. मात्र, संतोष देशमुख हयात नसल्यानं ग्रामस्थ दु:खी आहेत.
मस्साजोग संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात दुसऱ्या स्थानी
1/5

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात मस्साजोग ग्रामपंचायतीनं दुसरा क्रमांक मिळवला आहे. मस्साजोग ग्रामपंचायत कार्यालयाला बीडच्या जिल्हा परिषदेनं पत्र पाठवलं आहे.
2/5

सन 2020-21 व 2021-22 मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद बीड अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले होते.
3/5

या अभियानात मस्साजोग ग्रामपंचायत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. हे अभियान ज्यावेळी राबवण्यात आलं तेव्हा सरपंच म्हणून संतोष देशमुख ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत होते.
4/5

24 एप्रिल 2025 रोजी बीडच्या जिल्हा परिषदे मध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करून स्मृतीचिन्ह दिलं जाणार असल्याचा पत्रात उल्लेख. मात्र,सन्मान आणि स्मृतीचिन्ह स्वीकारण्यासाठी संतोष देशमुख आपल्यात नाहीत हे दु:ख गावकऱ्यांना आहे.
5/5

संतोष देशमुख यांनी केलेल्या कामाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे. मात्र,9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळं ग्रामपंचायतीला मिळणारा हा सन्मान स्वीकारण्यासाठी सरपंच देशमुख हयात नाहीत. या संदर्भातली माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड यांनी पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवली आहे. दरम्यान,मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण न्यायालयात सुरु आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. केवळ कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे.
Published at : 23 Apr 2025 10:21 PM (IST)
आणखी पाहा






















