एक्स्प्लोर
PHOTO : वडिलांनी कर्ज घेऊन पिकं जोपासली, आता कापसाचं पिक अक्षरशः आडवं झालंय; शेतकऱ्यांच्या मुलांनी सांगितली व्यथा
Beed News : बीड जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Beed News
1/10

बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सोयाबीननंतर आता कापसाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
2/10

पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली असली, तरी आजही शेतात चिखल साचलेला आहे. त्यामुळे शेतीकाम अडचणीत आले आहे.
3/10

सततच्या पावसामुळे उभं पीक आडवं झालं असून, अनेक ठिकाणी पिकं मुळासकट उपटली गेली आहेत.
4/10

कापसाच्या पिकाच्या दोड्यांमध्ये सड लागल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5/10

काही शेतकऱ्यांची जनावरं पावसात वाहून गेल्याचंही समोर आलं आहे.
6/10

अनेक शेतकऱ्यांनी बँका, सहकारी संस्था, खासगी सावकारांकडून कर्ज घेतलं असून, आता ते परत कसं फेडावं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
7/10

“वडिलांनी कर्ज घेऊन पीक घेतलं, पण आता सगळं वाया गेलं... काय करावं समजत नाही,” अशा व्यथा शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यक्त केल्या आहेत.
8/10

अद्याप पंचनामे सुरू झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागते आहे.
9/10

अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला असला तरी नुकसानभरपाई कधी मिळेल, किती मिळेल याची अनिश्चितता आहे.
10/10

प्रशासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published at : 26 Sep 2025 04:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























