एक्स्प्लोर
PHOTO : काय सांगता! एकाच वेळी गावकऱ्यांनी केले चारशे कंटेनरचे लक्ष्मीपूजन
Beed News : बीडच्या केज तालुक्यातील सांगवी (सारणी) गाव चर्चेत आले असून, या गावात तब्बल 250 कंटेनरची एकाचवेळी सामूहिक पूजा करण्यात आली आहे.
Lakshmi Pujan of four hundred containers
1/11

केज तालुक्यातील सांगवी (सारणी) गावातील तरुणांकडे एक, दोन नव्हे तर तब्बल 450 कंटेनर आहेत.
2/11

ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमधील हे चित्र अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरत आहे.
3/11

दरम्यान, याच गावात दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी 250 कंटेनर उभे होते.
4/11

या कंटेनरची सामूहिक पूजा हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे, सरपंच संजय केदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आली.
5/11

तर, 150 कंटेनर माल वाहतुकीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत असल्यामुळे त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे लक्ष्मीपूजन केले.
6/11

केज तालुक्यातील सांगवी (सारणी) हे गाव तसे अहमदपूर- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेले खेडेगाव आहे.
7/11

या गावची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या घरात असून मतदारांची संख्या 1350 इतकी आहे.
8/11

विशेष म्हणजे, 1995 ते 2000 दरम्यान गावातील काही तरुण विविध वाहनांवर क्लीनर म्हणून काम करीत होते.
9/11

यातूनच 2001 मध्ये गावातील 15 तरुण चालक बनले. नंतर कोणी स्वतःचे वाहन घेतले तर कोणी दुसऱ्याकडे चालक म्हणून काम केले.
10/11

छत्रपती संभाजीनगर येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये बहुतेक जण चालक म्हणून कामाला लागले. त्यानंतर कष्टाच्या बळावर आपापली प्रगती साधू लागले.
11/11

आज याच गावातील तरुणांकडे तब्बल तब्बल 450 कंटेनर आहेत. ज्यातील दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी 250 कंटेनर गावात उभे होते.
Published at : 13 Nov 2023 01:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























