एक्स्प्लोर
Diwali 2023 : दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा...
दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा...
diwali sweets
1/10

देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या निमित्ताने पूजेबरोबरच घर सजवण्याची आणि एकमेकांचे तोंड गोड करण्याची प्रथा खूप जुनी आहे.(Photo credit : Pixabay)
2/10

दिवाळीचे आगमन होताच बाजारपेठेत मिठाईची दुकाने सजतात. मात्र अशा परिस्थितीत बनावट आणि भेसळयुक्त मिठाईही मुबलक प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. भेसळयुक्त मिठाईमुळे शरीरासाठी घातक आहे. (Photo credit : Pixabay)
3/10

सण उत्सव प्रसंगी जेव्हा मिठाईची मागणी वाढते तेव्हा बनावट मिठाईचा वापर करून नफा मिळविण्यासाठी बनावट आणि रासायनिक रंगाच्या मिठाई बाजारात विकतात ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.(Photo credit : Pixabay)
4/10

बनावट मिठाई मिठाईचे दुष्परिणाम शरीराला कसे हानी पोहोचवू शकतात जाणून घ्या. (Photo credit : Pixabay)
5/10

बनावट मिठाई बनवण्यासाठी फसवणूक करणारे खवा आणि दुधाऐवजी बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, खडू, युरिया आणि इतर प्रकारची रसायने वापरतात. (Photo credit : Pixabay)
6/10

इतकंच नाही तर मिठाई सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अॅल्युमिनियम वर्कचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.(Photo credit : Pixabay)
7/10

मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायन मिसळणे, बनावट मावा, नकली दूध, यांचा वापर केला जातो. आणि आपण जर अशा प्रकारची मिठाई खात असाल तर यामुळे अनेक आजार तुम्हला होऊ शकतात. (Photo credit : Pixabay)
8/10

बनावट मिठाईच्या सेवनामुळे मेंदूचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अॅलर्जी होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(Photo credit : Pixabay)
9/10

अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅट सारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो (Photo credit : Pixabay)
10/10

मिठाईवरील अॅल्युमिनिअमचे पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठी हानी पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.(Photo credit : Pixabay)
Published at : 10 Nov 2023 06:49 PM (IST)
आणखी पाहा























