अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली. या शोमधून तिला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे.
2/6
10 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे जन्मलेल्या तेजस्वी प्रकाशचा ‘बिग बॉस 15’ची विजेती होण्यापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक होता.
3/6
इंजिनियर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या तेजस्वी प्रकाशने भारतीय टेलिव्हिजनच्या जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
4/6
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मुंबईतील वायंगणकर या मराठमोळ्या कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब संगीत क्षेत्राशी निगडीत आहे.
5/6
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे.
6/6
तेजस्वीने सुमारे चार वर्षे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले. तेजस्वीला इंजिनियर व्हायचे होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. (Photo : @Tejasswi Prakash/IG)