एक्स्प्लोर
Sonam Kapoor Birthday : सोनम कपूरने लंडनमध्ये साजरा केला बड्डे, पती-मुलासोबत केले ग्रँड सेलिब्रेशन, पाहा फोटो
Sonam Kapoor Birthday Pics: सोन कपूरच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यादरम्यान सोनम कपूरने आपला पती, मुलगा आणि मित्रांसमवेत बड्डेचा आनंद साजरा केला.

Sonam Kapoor Birthday Pics:
1/9

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने 9 जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला आहे. सोनमचा हा 38 वा वाढदिवस असून अत्यंत धुमधडाक्यात बड्डे साजरा केला आहे. तिने आपल्या वाढदिवसाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये सोनम आपल्या स्पेशल क्षणांचा आनंद घेताना दिसून येत आहे.
2/9

सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बरेच फोटो शेअर केले आहेत. यावेळी सोनम आपला बड्डे केक कापताना दिसून येत आहे, तर कधी आपल्या नवऱ्याचे चुंबन घेताना दिसून येत आहे.
3/9

सोनमच्या बड्डे पार्टीत तिचे अनेक मित्र-मंडळी सहभागी झाले होते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे मित्र बड्डे पार्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
4/9

सोनमने बड्डे पार्टीतील खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोच्या पोस्टसोबत तिने एका कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी दोन सुंदर मुले, मित्र, केक, शॅम्पेन, ऑयस्टर, कॅविअर आणि एक उन्हाळ्याचा दिवस! एखाद्या मुलीच्या यापेक्षा काय अपेक्षा असू शकतात? ज्यांनी मला शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचे मी आभार मानते.
5/9

वाढदिवसानिमित्त सोनमने चेरी रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत सोनमने गोल्डन ईअरिंग्स आणि क्लिप पेअर केले आहेत जे तिच्या आउटफिटसोबत जबरदस्त सुट करत आहेत.
6/9

लाईट मेकअप आणि ओपन कर्ली हेअर स्टाईल सोनमला प्रचंड सुट होत आहेत. सोनम कपूरने आपल्या लुकलला ब्लॅक हिल्ससोबत पूर्ण केलं आणि कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर पोज दिली आहे.
7/9

एका फटोमध्ये सोनमने एका मुलाला म्हणजे वायूला उचलून धरलं आहे आणि दुसऱ्या मुलाच्या म्हणजे आनंदच्या डोक्यावर हात ठेऊन स्माईल केलं आहे.
8/9

सोनम कपूरची बहिण, डिझाइनर आणि प्रोड्युसर रियानेसुद्धा सोनमच्या वाढदिसानिमित्त काही ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केल्याचे दिसून येत आहेत. या फोटोत सोनम कपूर खूपच हॉट दिसत आहे.
9/9

या दरम्याने रियाने सोनमला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 11 Jun 2023 08:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
