एक्स्प्लोर
Bigg Boss Winner : करणवीर मेहराकडून सिद्धार्थ शुक्लाच्या विक्रमाशी बरोबरी, बिग बॉस 18 जिंकून मारली बाजी
Bigg Boss 18 Winner : करणवीर मेहरा बिग बॉस 18 सीझनचा विजेता ठरला आहे, तर विवियन डिसेना यंदाच्या सीझनचा उपविजेता ठरला आहे.
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra
1/9

Bigg Boss Season 18 : छोट्या पडद्यावरील सलमान खानच्या प्रसिद्ध शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारीला धूमधडाक्यात पार पडला.
2/9

यासोबतच बिग बॉस 18 सीझनचा चॅम्पियन मिळाला आहे. अभिनेता करणवीर मेहरा यंदाच्या सीझनचा विजेता ठरला आहे, तर विवियन डिसेना उपविजेता ठरला आहे.
3/9

बिग बॉस 18 विजेत्याच्या शर्यतीत विवियन डिसेनाचं नावही आघाडीवर होतं. मात्र, विवियन डिसेनाला झटका देत करणवीर मेहराने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
4/9

बिग बॉस सीझन 18 विजेता करणवीर मेहराला बिग बॉस 18 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये बक्षीस मिळालं आहे.
5/9

बिग बॉस जिंकून अभिनेता करणवीर मेहरा याने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.
6/9

करणवीर मेहराने 'खतरों के खिलाडी' शोनंतर 'बिग बॉस 18' शोच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
7/9

करणवीर मेहरा दोन टेलिव्हिजन जिंकणारा दुसरा सेलिब्रिटी ठरला आहे. याआधी सिद्धार्थ शुक्लाने खतरों के खिलाडी आणि बिग बॉस हे दोन्ही शो जिंकले आहेत.
8/9

बिग बॉस 18 शोच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये रजत दलालचं नावही सामील होतं.
9/9

करणवीर मेहरा बिग बॉस 18 च्या विजेता ठरल्यामुळे विवियन डिसेनाच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
Published at : 20 Jan 2025 07:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
























