एक्स्प्लोर

Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका

Raigad Guardian Minister: भरत गोगावले यांना मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेत नाराजी. एकनाथ शिंदे गावी निघून गेले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती

मुंबई: राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन जिल्ह्यांबाबतच्या निर्णयाला अवघ्या 24 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली. यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, महायुतीमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंच्या गोटात सावध भूमिका घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. ते नसताना अचानक सूत्रं फिरली अन् रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या संयमाची भूमिका घेण्यात आल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार आहे. 

महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच पालकमंत्री पदावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. सध्या मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळे ते आल्यानंतरच यावर तोडगा निघणार असल्याने सध्या या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. 

शिंदे गटाला रायगडच्या पालकमंत्री भरत गोगावले यांची वर्णी लावायची होती. भरत गोगावले बराच काळापासून त्यासाठी मोर्चेबांधणी करत होते. तर नाशिकमध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटे असे बडे नेते असतानाही गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याने महायुतीमधील खदखद प्रचंड वाढली आहे. यावर आता काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपचे बडे नेते दरे गावाला जाणार

पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कोणाशीही एक शब्द न बोलता साताऱ्यातील आपल्या दरे या मूळगावी जाऊन बसले आहेत. परिणामी महायुतीत प्रचंड खदखद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे विशेष विमानाने दरे गावाला जाणार आहेत. याठिकाणी जाऊन हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांची समजूत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणार का आणि ते नेमकं काय पदरात पाडून घेणार, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग

व्हिडीओ

Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
T20 World Cup 2026 Points Table : टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
Nashik Container Loot Case : 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
Gopichand Padalkar and Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Embed widget