एक्स्प्लोर
Aishwarya-Abhishek Love Story: जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या हटके लव्हस्टोरीबद्दल...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/f1e60efd66b7eac77c03f21eb2ab0df51701948100077289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aishwarya Rai Bachchan
1/9
![अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/1146f26740518226be02b506189045c566f5e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे.
2/9
![बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांची लव्ह स्टोरी हटके आहे. जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/7f42f59bd56db075984246124479c9cb27391.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांची लव्ह स्टोरी हटके आहे. जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...
3/9
![1997 मध्ये जेव्हा ऐश्वर्या ही 'और प्यार हो गया' या चित्रपटात अभिषेकचा मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकदा भेट झाली होती. 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या हे भेटले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/6782f37825374ff0e1a610e225e84863fe3be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1997 मध्ये जेव्हा ऐश्वर्या ही 'और प्यार हो गया' या चित्रपटात अभिषेकचा मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकदा भेट झाली होती. 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या हे भेटले होते.
4/9
![दोघांनी ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. तेव्हा ऐश्वर्या ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि 2002 मध्ये अभिषेकचे करिश्मा कपूरसोबत लग्न होणार होते. पण, काही कारणास्तव करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न होऊ शकले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/71c6d6a6b948ac0841eed52ec675b414d4c89.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनी ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. तेव्हा ऐश्वर्या ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि 2002 मध्ये अभिषेकचे करिश्मा कपूरसोबत लग्न होणार होते. पण, काही कारणास्तव करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न होऊ शकले नाही.
5/9
![ऐश्वर्या आणि सलमान खानचा ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या ही विवेक ओबेरॉयच्या प्रेमात पडली होती. पण त्यांचे देखील काही कारणांमुळे ब्रेकअप झाले. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकमेकांच्या प्रेमात पडले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/0b8811fb4e7c0679e885a3c75600966409e6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या आणि सलमान खानचा ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या ही विवेक ओबेरॉयच्या प्रेमात पडली होती. पण त्यांचे देखील काही कारणांमुळे ब्रेकअप झाले. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकमेकांच्या प्रेमात पडले.
6/9
![2006 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकला खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. त्यावेळी 'उमराव जान' व्यतिरिक्त दोघेही 'गुरू' आणि 'धूम 2' या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होते. ऐश्वर्याच्या प्रेमात पडलेल्या अभिषेकने अखेर तिला लग्नासाठी प्रपोज केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/d556b9b29b8c173da8eab8f4885c78ac7dd87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2006 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकला खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. त्यावेळी 'उमराव जान' व्यतिरिक्त दोघेही 'गुरू' आणि 'धूम 2' या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होते. ऐश्वर्याच्या प्रेमात पडलेल्या अभिषेकने अखेर तिला लग्नासाठी प्रपोज केले.
7/9
![अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/c1b956726b7f8e14fcb826fd805c65c749603.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी न्यूयॉर्कमध्ये असताना हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभी राहायचो आणि विचार करायचो की एक दिवस मी तिच्याशी लग्न करू शकले तर किती छान होईल." न्यूयॉर्कमधील त्याच हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकनं ऐश्वर्याला नेले आणि लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर ऐश्वर्यानं होकार दिला.
8/9
![न्यूयॉर्कवरुन दोघेही मुंबईला परतले, तेव्हा 14 जानेवारी 2007 रोजी त्यांनी लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्यानं एका झाडासोबत लग्न केलं, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. त्या काळात असं म्हटलं जात होतं की, एका प्राचीन विधीमध्ये दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्यानं एका झाडाशी लग्न झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/7ea2de4ae2f60b3a1ba052d3823e2107619d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूयॉर्कवरुन दोघेही मुंबईला परतले, तेव्हा 14 जानेवारी 2007 रोजी त्यांनी लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्यानं एका झाडासोबत लग्न केलं, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. त्या काळात असं म्हटलं जात होतं की, एका प्राचीन विधीमध्ये दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्यानं एका झाडाशी लग्न झालं होतं.
9/9
![यासर्व चर्चांवर 2007 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/842ab49ba067212b74aae6edbf6ba5f118f31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासर्व चर्चांवर 2007 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, " ते झाड कुठे आहे? कृपया मला ते दाखवा. ज्याच्यासोबत तिने लग्न केले आहे तो माझा मुलगा आहे. तुम्हाला अभिषेक झाड आहे असं वाटतं का?." 2016 मध्ये अभिषेकनं ट्वीट केलं होतं, "आणि फक्त रेकॉर्डसाठी, आम्ही अजूनही हे झाड शोधत आहोत"
Published at : 07 Dec 2023 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)