एक्स्प्लोर
Manoj Bajpayee Life Fact: वयाच्या आठव्या वर्षी मनोज बाजपेयीला वडिलांनी दिला गांजा; नंतर काय घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल!
बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्याच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या बालपणातील अनेक किस्से शेअर केले आहेत.
Manoj Bajpayee
1/5

मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे बालपणीचे दिवस आठवले, यावेळी त्यांनी लहानपणीचा एक अनुभव सांगितला. मनोज बाजपेयी 8 वर्षांचा असताना भाऊ आणि बहिणीसोबत गांजाच्या नशेत पडला होता. आईने नकार देऊनही वडील आम्हाला गांजा द्यायचे, असं मनोज बाजपेयीने सांगितलं.
2/5

मनोजने पुढे सांगितलं की, एकदा होळीच्या दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला अर्धा ग्लास थंडाई दिली होती, ज्यामध्ये गांजा मिसळला होता आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्याची आई खूप चिडली होती.
3/5

मनोज बाजपेयी सहा भावंड आणि पालकांसोबत राहत असे, त्यामुळे सणासुदीला त्यांच्या घरी सुमारे 3 किलो मटण तयार होतं, असं तो म्हणाला आणि होळीच्या दिवशी गांजा प्यायलो तेव्हा ते 3 किलो मटण मी एकट्यानेच संपवलं, असंही मनोज याने सांगितलं.
4/5

त्यावेळी सर्वजण गांजाच्या नशेत असल्याने आई कोणालाही काही बोलली नाही, असेही मनोजने सांगितले. पण नंतर खूप शिवीगाळ झाली.
5/5

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मनोज लवकरच 'सिर्फ एक बंदा काफी है' मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट 23 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Published at : 19 May 2023 11:51 PM (IST)
आणखी पाहा






















