Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report
इंडिगो... या भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपनीची सेवा अजूनही विस्कळीतच आहे. देशभरात गेल्या आठवडाभरात इंडिगोची तब्बल ४ हजार पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली आहेत. त्यामुळे आता इंडिगो एअरलाईन्सला सरकारने आणि डीजीसीएने दणका दिलाय... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
आठवडा सरला
मात्र इंडिगोला अजूनही गोंधळ सावरता येत नाहीय..
दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना....
इंडिगो एअरलाईन्सला सरकारने आणि डीजीसीएने दणका दिला...
एफडीटीएलचे नवे नियम वेळीच न पाळल्यामुळे इंडिगोचा नोव्हेंबरपासून घोळ सुरू झाला.
नोव्हेंबर महिन्यात इंडिगो एअरलाईन्सने १७०० हून अधिक उड्डाणं रद्द केली.
तर ३ डिसेंबरपासून इंडिगोने गेल्या सहा दिवसांत ४ हजारांहून अधिक उड्डाणं रद्द केली.
यामुळे प्रवाशांचे कमालीचे हाल झाले.
प्रवाशांचं हजारो कोटींचं नुकसान झालं,
प्रवासी वाहतुकीसह व्यापार उदीमही रखडला...
या सगळ्याचे परिणाम आता इंडिगोला भोगावे लागताहेत
सरकारच्या कठोर पवित्र्यानंतर नागरी हवाई वाहतुकीच्या महासंचालकांनीही इंडिगोविरोधात सक्त कारवाई केलीय.
सरकारचं कारवाईचं उड्डाण - हेडर
इंडिगोला तातडीने त्यांचं शेड्युल ५ टक्क्यांनी घटवण्याचे आदेश
उच्च मागणी असलेल्या मार्गांवरच उड्डाणं करण्याबाबत निर्बंध
१० डिसेंबरलाच इंडिगोला आपलं नवं शेड्युल डीजीसीएला द्यावं लागणार
त्याशिवाय डीजीसीएच्या ४ सदस्यीय समितीने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्या चौकशीला उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलंय. केवळ दंडात्मक कारवाई करून पुरेसं होणार नाही असं डीजीसीएचं मत असल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर कारणे दाखवा नोटिशीवर इंडिगोच्या उत्तराचीही उद्या शहानिशा होणार आहे. ))
दरम्यान डीजीसीएच्या कारवाईनंतर नागरी हवाई वाहतूक खात्याचे सहसचिव मधुसूदन शंकर यांनी अचानक मुंबई विमानतळाला भेट देत पाहणी केली...
1. साप्ताहिक विश्रांती - सबहेडर
वैमानिकांना आता सलग ४८ तासांची साप्ताहिक विश्रांती अनिवार्य आहे.
यापूर्वी ही मर्यादा 36 तास होती.
2. रात्रीच्या लँडिंगची मर्यादा - सबहेडर
पायलट आता जास्तीत जास्त रात्रीच्या दोन लँडिंग करू शकतात.
आधी ही मर्यादा सहा इतकी होती.
3. सलग रात्रीच्या ड्युटीची मर्यादा - सबहेडर
दोनपेक्षा जास्त सलग रात्रीच्या ड्युटी करण्यास मनाई आहे.
4. रोस्टरमध्ये अनिवार्य बदल - सबहेडर
नवीन मर्यादांच्या आधारे विमान कंपन्यांना क्रू रोस्टर पुन्हा तयार करावा लागेल.
5. त्रैमासिक थकवा अहवाल देणे - सबहेडर
प्रत्येक विमान कंपन्यांनी दर तीन महिन्यांनी थकवा जोखीम (Fatigue Risk) अहवाल DGCA ला पाठवणे अनिवार्य आहे.
या नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्यामुळे इंडिगोवर मोठं संकट ओढवलंय
आता इंडिगो यातून कसं आणि कधी सावरतंय... तसंच सावरताना इंडिगोला आणखी कोणकोणते धक्के सहन करावे लागणार याकडे एअरलाईन्स इंडस्ट्रीचं लक्ष असेल..
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































