एक्स्प्लोर
Shah Rukh Khan: शाहरुखनं चाहत्यांचे मानले आभार; पोस्ट शेअर करत म्हणाला...
पठाण (Pathaan) चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले.
pathaan,shah rukh khan
1/10

अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं.
2/10

शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर झाला आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
3/10

पठाण या चित्रपटानं भारताबरोबरच परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
4/10

आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले.
5/10

शाहरुखनं ट्विटरवर त्याचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये शाहरुखच्या मागे सूर्यकिरण दिसत आहेत. (Shah Rukh Khan/twitter)
6/10

शाहरुख खाननं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सूर्य एकटा आहे. तो जळतोय. तो अंधारातून पुन्हा प्रकाशात येतो. पठाणवर एवढं प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! '
7/10

शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या ट्वीटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शाहरुखच्या या ट्वीटला 55 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे.
8/10

शाहरुख खानच्या पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 14 दिवस झाले आहे. 14 दिवसांमध्ये या चित्रपटानं जगभरात 850 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
9/10

भारतामध्ये या चित्रपटानं 446.20 कोटींचं कलेक्शन केलं आहे. हा चित्रपट भारतामध्ये 500 कोटीचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे.
10/10

पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
Published at : 08 Feb 2023 08:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
